|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कालिदासांच्या कवितांना भारतीय तत्त्वज्ञान

कालिदासांच्या कवितांना भारतीय तत्त्वज्ञान 

प्रतिनिधी / बेळगाव

कवी कालिदासांच्या कवितांना भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा मूळ आधार होता. त्यांनी स्त्राrवर आधारित रचलेल्या अनेक कविता अजरामर झाल्या आहेत. कालिदास हे साहित्यासह इतिहासातूनही आपल्या जवळ आले आहेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुनिता बोर्डे-खडसे यांनी केले.

येथील शब्दगंध कवी मंडळातर्फे कालिदास दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक याळगी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, काव्यलेखना मागील प्रेरणा या नैसर्गिक असतात. कविता करत असताना ती मनातून उत्स्फूर्तपणे बाहेर आली पाहिजे. कालिदास हे तपश्चर्या आणि अभ्यासाच्या जोरावर विद्वान झाले. प्रत्येकाने आपले अस्तित्व सिद्ध करायला हवे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित कवींना मार्गदर्शन करताना कवींनी आपल्या कविता या बंदिस्त न ठेवता त्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करावा. आपण पुरस्काराची अपेक्षा न करता समाजच आपल्याला आठवणींच्या रूपाने पुरस्कार देत असतो, असे सांगितले.

प्रारंभी मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी ओगले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. व्यासपीठावर सचिव अशोक आळगोंडी उपस्थित होते.

कार्यक्रमात शब्दगंध कवी मंडळातर्फे आयोजित कविता स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक रविकिरण, द्वितीय क्रमांक मधू पाटील व तृतीय क्रमांक दौलत राणे यांनी मिळविला. याव्यतिरिक्त दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुभाष सुंठणकर यांनी काम पाहिले होते.