|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ातील 523 नळपाणी योजनांचा होणार स्पॉट पंचनामा

जिल्हय़ातील 523 नळपाणी योजनांचा होणार स्पॉट पंचनामा 

पूर्ण होऊनही त्रुटी राहिलेल्या योजनांच्या पाहणीसाठी समिती गठीत

लेखाविषयक त्रुटी प्रत्यक्ष जागेवर सोडविणार

प्रतिनिधी /रत्नागिरी

जिल्हय़ातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गंत हाती घेण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनांपैकी अनेक योजनांची कामे पूर्ण झालेली आहेत. पण योजना पूर्ण होऊनही त्यातील राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी 523 नळपाणी योजनांचा ‘स्पॉट पंचनामा’ नेमण्यात आलेल्या विशेष समितीमार्फत होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन गठीत करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागस्तरावर जिल्हय़ात नळपाणी योजना पूर्ण झालेल्या असताना त्यांचा आर्थिक लेखाजोखा अजूनही पूर्णत्वाकडे गेलेला नसल्याचे सांगण्यात आले. योजना पूर्ण होऊनही त्या कागदोपत्री अजूनही अपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या बाबत जलव्यवस्थापनच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. योजनांची कामे अपूर्ण असल्याने त्या कामांच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात यावी, अशा सूचना सदस्यांनी केल्या होत्या. त्यानुसार कागदोपत्री अपूर्ण दाखवण्यात आलेल्या योजनांचा ‘स्पॉट पंचनामा’ करण्याचे सूचित करण्यात आले होते.

त्या कार्यवाहीची जबाबदारी प्रत्येक तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती सभापती यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ही समिती अपूर्ण राहेलेल्या योजयांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावेळी कागदोपत्री झालेला गोंधळाचा त्याच ठिकाणी फैसला लावण्यात येणार आहे. या तालुकास्तरावरील तक्रारींच्या निपटाऱयासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ जि. प. सदस्य, पाणी पुरवठा अधिकारी, शाखा अभियंत्यांचा समावेश आहे. या समितीचा अहवाल पुढील 3-4 महिन्यात तयार केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Related posts: