|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नोबेल पुरस्कार विजेत्या चिनी साहित्यिकाची पॅरोलवर मुक्तता

नोबेल पुरस्कार विजेत्या चिनी साहित्यिकाची पॅरोलवर मुक्तता 

बीजिंगः

 चीनमध्ये कैदेत असलेले नोबेल शांतता पुरस्कार विजेते ख्यातनाम साहित्यिक लीऊ-शिआओबो यांची वैद्यकीय कारणास्तव पॅरोलवर सोमवारी सुटका करण्यात आली आहे. गत महिन्यात झालेल्या वैद्यकीय चाचणीत त्यांना यकृताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांची आज सुटका करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. लीऊ यांची बिनशर्त मुक्तता करण्याची मागणी करत त्यांचे समर्थक करत होते. 23 मे रेजी लीऊ यांचा आजार अखेरच्या टप्प्यात पोचल्याचे स्पष्ट झाले होते. 11 वर्षांच्या शिक्षेपैकी 3 वर्षे कारागृहात काढलेल्या लीऊ यांची सोमवारी त्यामुळे सुटका करण्यात आली आहे. लोकशाहीचे खंदे समर्थक असलेल्या 61 वर्षीय लीऊ यांच्यावर शेनयांग शहराच्या एका इस्पितळात उपचार सुरू असल्याचे त्यांचे वकील मो शाओपींग यांनी सांगितले. चीनमधील कथित एकपक्षीय साम्यवादाचे लीऊ हे कट्टर विरोधक समजले जातात. चीनमधील मानवी हक्काची सर्रास होत असलेली गळचेपी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘चार्टर 08’ च्या निर्मितीत त्यांचा सहभाग होता. याच कारणास्तव 2008 साली त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.