|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहरात रमजान ईद उत्साहात ; शांततेसाठी नमाज पठण

शहरात रमजान ईद उत्साहात ; शांततेसाठी नमाज पठण 

प्रतिनिधी/ सोलापूर

देशात सध्या नांदत असलेली शांती आणि सामाजिक सौहार्द असेच कायम राहू दे, समाजाच्या विकासाबरोबर सर्वांचे स्वास्थ टिकून राहु दे, चांगला पावसाने शेतकरी सुखी राहील अशी प्रार्थना शहर काझी सय्यद अमजद अली काझी यांनी इदनिमित्त केली. होटगी रोडवरील आलमगीर मैदानावर झालेल्या सामुहिक नमाज पठणानंतर त्यांचे प्रवचन झाले.  

  मुस्लिम धर्मातील पवित्र सण रमजान ईदनिमित्त शहरातील पाच ठिकाणी ईदगाह मैदानावर नमाज पठण झाली. ईदगाह ट्रस्टच्या वतीने केलेल्या तयारीनंतर सोमवारी शहरातील मुस्लिम बांधवांनी सामुहीक नमाज पठण केले. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 

देशभरातील मुस्लिम बांधव तब्बल महिनाभर रोजे (उपवास) ठेवल्यानंतर या महिन्याचा शेवट उत्साहात रमजान सण साजरा करुन करतात. यंदाची रमजान ईद रविवारी चंद्रदर्शन झाल्यामुळे सोमवारी 26 जून रोजी झाली. शहरातील पाच  ईदगाह ठिकाणावर मुस्लिम बांधव नमाज अदा करतात.  

होटगी रोड येथील आलमगीर ईदगाह या ठिकाणी 9 वाजता नमाज पठण झाली असून, मुफती सय्यद अमजद अली काझी यांनी बयान दिली. रंगभवन येथील अहलेहदीस ईदगाह मैदानावर सकाळी 8 वाजता नमाज पठण झाली. त्यानंतर अब्दुल नाफेकाझी यांनी बयान दिले. त्याचबरोबर पानगल शाळेतील शाही आलमगीर ईदगाह मैदानावर सकाळी 9 वाजता नमाज पठण झाली. शहर काझीचे वडील अब्बास काझी यांनी बयान दिली. जुनी मिल कंपाऊंड येथील आदिलशाह ईदगाह मैदानावर सकाळी 9.30 वाजता नमाज पठणानंतर मौलाना फजलुल्लाह खतीब यांनी बयान मार्गदर्शन केले. पाचवे मैदान असलेल्या आसार मैदान ईदगाह याठिकाणी सकाळी 10.30 वाजता नमाज पठण झाल्यानंतर याच ठिकाणी मौलाना अब्दुस सलाम रजवी यांनी बयान (प्रवचन) दिले.