|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » अमेरिकेचा इसिसच्या तुरुंगावर हल्ला ; 57 जण ठार

अमेरिकेचा इसिसच्या तुरुंगावर हल्ला ; 57 जण ठार 

ऑनलाईन टीम / मोसुल :

सीरियामध्ये इसिसच्या तुरुंगावर अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला. अमेरिकेच्या या हल्ल्यामध्ये 57 कैद्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेने हवाई हल्ला पूर्व सीरियाच्या मायादीन ठिकाणावर केला असल्याची माहिती मिळत आहे.

इसिसच्या या तुरुंगात असंख्य कैदी होते. यापैकी 44 कैदी आणि 15 दहशतवादी ठार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या विमानांद्वारे इसिसच्या तुरुंगात हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर इसिसच्या दहशतवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts: