|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इचलकरंजी परिसरात राजर्षी शाहू जयंती उत्साहात

इचलकरंजी परिसरात राजर्षी शाहू जयंती उत्साहात 

प्रतिनिधी/  इचलकरंजी

येथे व परिसरात राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक राजकीय पक्ष संघटना व प्राथमिक, माध्यमिक शाळांमधून जयंतीनिमित्त प्रतिमापूजन, व्याख्यान, विद्यार्थ्यांची भाषणे असे विविध उपक्रम घेण्यात आले.

कै. बाबुराव आवाडे विद्यामंदिर

      येथील कै. बाबुराव आवाडे विद्यामंदिर येथे शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे होते. अध्यापक जयसिंग भिसे व विद्यार्थ्यांनी शाहू महाराजाविषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्नीकांत दौंडे, अध्यापक संतोष होगाडे उपस्थित होते. यावेळी अध्यापिका शरयू हावळ यांनी आभार मानले.                

  विनायक हायस्कूल, शहापूर

      येथील विनायक हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची 143 वी जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापक अशोक हुबळे यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. यावेळी शाम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. शितल चौगुले यांनी केले. तर आभार श्नाr. सदावर्ते यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

   नाकोडा हिंदी विद्यामंदिर

      येथील नाकोडा एज्युकेशन सोसायटी संचलित नाकोडा हिंदी विद्यामंदिर येथे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थीनी प्रतिनीधी अनिता वाघाराम चौधरी हिच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक वि. ह. सपाटे यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेवून सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्नी. व्ही. एस. पाटील यांनी केले. यावेळी सौ. एम. बी. सकटे, सौ. पी. पी. पाटील, श्नी. पी. बी. दरबारे, अशिष निंबाळकर, ऋतुराज उमाजे, श्नी. व्ही. डी. गावित, सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.    

 

            श्नी बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज

     श्नाr. बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये छ. शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम. एस. रावळ यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

    याप्रसंगी सौ. रावळ यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग, घटना, सांगून महाराजांचे चरित्र कथन केले. शाहू महाराजांनी केलेली तत्कालीन आरक्षण पध्दती, जातीभेद निवारण तसेच भविष्यकालीन पाण्याचे नियोजन, औदय़ोगिक क्षेत्रातील प्रगती, बहुजनांच्या शिक्षणासाठी केलेली सोय, त्यांचे शिक्षणावरील प्रेम, विद्यार्थ्यांच्या सोईसाठी व शिक्षणाच्या प्रसारासाठी वसतिगृह व भोजनाची सोय, सर्व प्रकारच्या कलावंताना दिलेला आश्नय, कुस्तीच्या विकासासाठी केलेले प्रयत्न याव्दारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाहू जयंती निमित्त समता दिंडी काढण्यात आली. यामध्ये प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी झाले होते.

        

              कुमार विद्यामंदिर, गंगानगर-कबनूर

      कै. दादासाहेब रामचंद्र मगदूम स्मारक समिती संचलित कुमार विद्यामंदिर येथे शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. सौ. वासंती धामणीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर शिक्षक परशराम आवळे यांनी शाहूचे जीवन कार्य आपल्या मानेगतातून व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात अशोक कांबळे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. समाजिक समतेसाठी आरक्षणाचा कायदा करणारा जगातील पहिला राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज असे गौरवोद्गार काढले. यावेळी सूत्रसंचलन सौ. शशिकला रेळेकर यांनी केले. तर सौ. सुरेखा स्वामी यांनी आभार मानले.

Related posts: