|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उधाणाच्या भरतीने किनारपट्टीवर धकधक

उधाणाच्या भरतीने किनारपट्टीवर धकधक 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

अमावस्येनंतरही समुद्राला आलेल्या उधाणाने सलग दुसऱया दिवशीही रत्नागिरीतील मांडवी, मिऱया येथील किनारपट्टीवर दणका दिला. मिऱया बंधाऱयाला पुन्हा एकदा जोरदार तडाखा बसल्याने भगदाड पडले आहे. तर मांडवी येथे उसळलेल्या लाटांनी समुद्रात फेकण्यात आलेल्या कचऱयाचे साम्राज्य रस्त्यावर पसरले होते.

अमावास्येला आलेल्या उधाणाचा फटका किनारपट्टीवर बसत आहे. त्यामुळे किनारपट्टीवर विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. सोमवारी रत्नागिरीतील मिऱया व मांडवी येथील किनारपट्टीला उधाणाच्या लाटांनी जोरदार तडाखा दिला. लांटांचे पाणी थेट लोकवस्तीजवळ येऊन ठेपले होते. मिऱया येथे उसळलेल्या लाटा धुपप्रतिबंधक बंधारा ओलांडून गेल्या होत्या. या बंधाऱयाला यापूर्वी आलेल्या उधाणाने पडलेल्या भगदाडाच्या ठिकाणी आणखीन वाढ झाल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.

मंगळवारीही सकाळी उधाणाच्या भरतीने दाणादाण उडवली. मांडवी येथील जेटीच्या प्रवेद्वारापाशी उसळलेल्या लाटांचे पाणी थेट रस्त्यावर येऊन पोहचले होते. त्यामुळे लाटांच्या माऱयाने समुद्रात फेकण्यात आलेला सारा कचरा पुन्हा किनाऱयावर आला. मांडवी जेटीवरील रस्त्यावर या कचऱयाचे साम्राज्य लाटा ओसरल्यानंतर पहावयास मिळाले. उधाणाची ही भरती पाहण्यासाठी मांडवी येथे नागरिकांनीही गर्दी केली होती. रत्नागिरी तालुक्यातील इतर किनारीभागातही उधाणाच्या भरतीचे पाणी वाढल्याने नागरिकांतून सतर्कता राखण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: