|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » मंजुळा शेटय़ेंवर निर्भयासारखे अत्याचार ; इंद्राणी मुखर्जीचा धक्कादायक आरोप

मंजुळा शेटय़ेंवर निर्भयासारखे अत्याचार ; इंद्राणी मुखर्जीचा धक्कादायक आरोप 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भायखळा तुरुंगामधील कैदी मंजुळा शेटय़े यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर निर्भयासारखे अत्याचार करण्यात आले, असा गंभीर आरोप इंद्राणी मुखर्जीने तुरुंग प्रशासनावर केला.

भायखळा तुरुंग प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणाऱया इंद्राणी मुखर्जीची सत्र न्यायालयासमोर साक्ष नोंदवण्यात आली. मंजुळा शेटय़ेच्या हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप इंद्राणीने न्यायालयासमोर केला आहे. मंजुळा शेटय़ेवर लैंगिक अत्याचार केल्याचे इंद्राणीने न्यायालयासमोर सांगितले. तसेच भायखळा कारागृहातील घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने महिला कैद्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी लाठीचार्जसाठी महिलांसह पुरुष स्टाफही सहभागी झाला होता, अशी माहिती मुखर्जीने न्यायालयात दिली.