|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » गोरक्षेच्या नावाखाली होणाऱया हिंसेमुळे दुःख होते : पंतप्रधान

गोरक्षेच्या नावाखाली होणाऱया हिंसेमुळे दुःख होते : पंतप्रधान 

ऑनलाईन टीम / साबरमती :

गोरक्षेच्या नावाखाली जी हिंसा होते त्याचे मला अतीव दुःख होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच गोरक्षेसाठी सगळ्यात मोठे योगदान विनोबा भावे आणि महात्मा गांधी या दोन नेत्यांनी दिले आहे.

साबरमती येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी पहिल्यांदाच या मुद्यावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात गोरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. तसेच ज्या देशात मुंग्यांना अन्न देणे पुण्य समजले जाते, भटक्या कुत्र्यांना खायला ही इथली भूतदया आहे, त्या देशाला काय झाले आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.