|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » मंजुळाच्या गुप्तांगाला जखमा नाहीत ; जेल प्रशासनाचा दावा

मंजुळाच्या गुप्तांगाला जखमा नाहीत ; जेल प्रशासनाचा दावा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मंजुळा शेटय़े या महिलेच्या गुप्तांगाला जखमा नाहीत, असा दावा जेल प्रशासनाने केला आहे. भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुळा शेटय़े यांच्या मृत्यूप्रकरणी जेल प्रशासनाकडून अहवाल सादर करण्यात आला.

मुंबईतील भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत असलेली महिला कैदी मंजुळा शेटय़े यांच्या मृत्यूप्रकरणी त्याच जेलमध्ये कैदी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने कालच कोर्टात धक्कादायक माहिती दिली होती. जेलमध्ये असताना मंजुळावरही निर्भयासारखेच अत्याचार झाले होते, असे इंद्राणीने न्यायालयात आरोप केला होता. त्यानंतर याप्रकरणाची गंभीर घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

Related posts: