|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » विनाकारण हॉर्न वाजवणाऱया वाहनचालकांवर होणार कारवाई

विनाकारण हॉर्न वाजवणाऱया वाहनचालकांवर होणार कारवाई 

ऑनलाईन टीम / मुंबई :

टॅफिकमध्ये तसेच शांतता क्षेत्रात विनाकारण हॉर्नचा वापर करणाऱयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

ध्वनी प्रदूषणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरु आहे. यावेळी ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात करण्यात आला. याच संदर्भात गृहविभागाने प्रतिज्ञापत्र गुरुवारी उच्च न्यायालयात सादर केले. यामध्ये राज्य सरकारने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पूर्तता करत असल्याचा दावा केला आहे.