|Monday, January 22, 2018
You are here: Home » Top News » गोवा आता ‘टोल फ्री’

गोवा आता ‘टोल फ्री’ 

ऑनलाईन टीम / पणजी :

एक देश, एक टॅक्स या योजनेंतर्गत गोव्यात टोलमुक्ती देण्यात आली आहे. ही टोलमुक्ती आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. याचा पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. जीएसटीमुळे देशभरात वस्तू आणि सेवांसाठी एकच करप्रणाली लागू होणार आहे. यातच आता गोव्यात पर्यटकांची वर्दळ पाहता, पर्यटकांच्या सोयीसाठी गोवा सरकारने राज्यात प्रवेश करणाऱया वाहनांसाठी टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही टोलमाफी आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Related posts: