|Monday, October 22, 2018
You are here: Home » उद्योग » जीएसटीच्या स्वागतासाठी बाजार सज्ज

जीएसटीच्या स्वागतासाठी बाजार सज्ज 

बीएसईचा सेन्सेक्स 64, एनएसईचा निफ्टी 17 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

जुलै महिन्याच्या सीरिजला शुक्रवारी प्रारंभ झाल्याने बाजारात चांगलाच चढ-उतार दिसून आला. दिवसात खालच्या पातळीवरून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून आली. निफ्टी 9,448 आणि सेन्सेक्स 30680 पर्यंत घसरले होते. अखेरीस निफ्टी 9,500 च्या वर बंद झाला. निफ्टी 70 आणि सेन्सेक्समध्ये 250 अंशाची रिकव्हरी दिसून आली.

बीएसईचा सेन्सेक्स 64 अंशाने मजबूत होत 30,922 वर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी 17 अंशाच्या तेजीने 9,521 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली रिकव्हरी आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी वधारत 14645 वर बंद झाला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 14,486 पर्यंत घसरला होता. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.7 टक्क्यांनी मजबूत होत 15,410 वर बंद झाला. हा निर्देशांक 15,216 पर्यंत घसरला होता.

एफएमसीज, औषध, पीएसयू बँक, मीडिया, आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऊर्जा समभागात चांगली खरेदी झाली. बँक निफ्टी वधारत 23211 वर बंद झाला. निफ्टीचा पीएयसू बँक निर्देशांक 0.7 टक्क्यांनी वधारला. निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 2.3 टक्के, औषध निर्देशांक 2 टक्के, मीडिया निर्देशांक 0.75 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 2.1 टक्के आणि ऊर्जा निर्देशांक 0.6 टक्क्यांनी मजबूत झाले.

वाहन, स्थावर मालमत्ता, आणि तेल आणि वायू समभागात विक्री झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.25 टक्क्यांनी घसरला, तर बीएसईचा स्थावर मालमत्ता निर्देशांक 0.5 टक्क्यांनी कमजोर झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

बँक ऑफ बडोदा, आयटीसी, सन फार्मा, सिप्ला, बीपीसीएल, टाटा स्टील, डॉ. रेड्डीज लॅब 4-1.5 टक्क्यांनी मजबूत झाले. टाटा मोटर्स डीव्हीआर, इंडियाबुल्स हाऊसिंग, टेक महिंद्रा, टाटा पॉवर, आयशर मोटर्स, हीरो मोटो, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि रिलायन्स इन्डस्ट्रीज 1.9-0.9 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात ब्लू डार्ट, व्हिडिओकॉन, ओबेरॉय रिअल्टी, इंडियन हॉटेल्स आणि कन्साई नेरोलॅक 7.1-3.5 टक्क्यांनी मजबूत झाले. स्मॉलकॅप समभागात एचईजी, व्हीएसटी इन्डस्ट्रीज, जेपी इन्फ्रा, मेघमणी ऑर्गेनिक्स आणि सोना कोयो 14-8.3 टक्क्यांनी मजबूत झाले.

Related posts: