|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवण व्हाया साळकुंभा बस सुरू करावी

मालवण व्हाया साळकुंभा बस सुरू करावी 

वार्ताहर/ चौके

  तालुक्यातील साळकुंभा गावात एसटी बस जात नसल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. एसटीसाठी साळकुंभावासियांना दोन किमी पायपीट करीत मालवण-बागायत या मुख्य रस्त्यावर यावे लागत असल्याने बराच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन या मार्गावरील कोणतीही बस व्हाया साळकुंभा सुरू करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी मालवण एसटी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.

 याबाबतचे निवेदन साळकुंभा ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांकडे सादर केले आहे. साळकुंभा गावात ग्रामस्थांसह सुमारे 15 विद्यार्थ्यांना मालवण मध्ये ये-जा करावी लागते. मात्र, यासाठी एसटी बस पकडण्यासाठी गावापासून 2 किमी असणाऱया मालवण-बागायत या मुख्य रस्त्यावर यावे लागते. यात शालेय विद्यार्थ्यांचा रोज बराच वेळ वाया जातो. त्यामुळे मुख्य मार्गावरून जाणारी कोणतीही बस व्हाया साळकुंभा सुरू करावी. गावापासून मुख्य मार्गापर्यंतचा रस्ता हा डांबरी असून एसटी बस वाहतुकीस योग्य आहे. या मार्गावरील कुठलीही गाडी व्हाया साळकुंभा सकाळी 10 वाजता व सायंकाळी मालवणहून 6 वाजता सोडावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 याबाबत आगार व्यवस्थापकांशी येत्या दोन-तीन दिवसांत कार्यवाही करून साळकुंभापर्यंत बस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक आप्पा लुडबे, सामाजिक कार्यकर्ते महेश गिरकर, बाबू मांजरेकर, सुहासिनी मांजरेकर, अनिषा किडये, पूजा पोखरणकर, दर्शना पोखरणकर, वैशाली मांजरेकर, सावित्री टेमकर, भावना गिरकर, प्रमिला साळगावकर, प्रतिभा मांजरेकर, विलासिनी मांजरेकर, भाग्यश्री मांजरेकर, ममता साळगावकर, प्राजक्ता मेस्त्राr, दिगंबर कोचरेकर, पांडुरंग पोखरणकर, दशरथ पोखरणकर, भालचंद्र पोखरणकर, भगवान मांजरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.