|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जीएसटीमुळे सर्वसामान्यांना लाभ होणार- श्रीपाद नाईक

जीएसटीमुळे सर्वसामान्यांना लाभ होणार- श्रीपाद नाईक 

प्रतिनिधी/ पणजी

वस्तू आणि सेवा कर प्रणाली(जीएसटी) ही सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.  या पध्दतीमुळे करप्रणाली सुसूत्रता निर्माण होईल. जीएसटी सुरळीत होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण नंतर सर्वकाही सुरळीत होईल, आणि काही राज्यात तसे झाले नाही तर केंद्र सरकार नुकसान उकलण्यास तयार असेल, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

पणजी येथे पत्र सूचना कार्यालयातर्फे आयोजित माध्यम कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जीएसटीचे आयुक्त के. अनपाझकन, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक डी. वी. विनोद कुमार, व सहायक संचालक बालाजी प्रभूगांवकर यांची उपस्थित होती.

वस्तू आणि सेवा कर प्रणालीसाठी सर्व राजकीय पक्षंनी दिलेली मान्यता हे देशाच्या परिपक्व लोकशाहीचे प्रतिक आहे. कर प्रणाली हा देशाच्या अर्थव्यवस्था  कणा आहे, त्यामुळे ती अतिशय सुलभ आणि सरळ असली पाहीजे. त्यामुळेच जीएसटीची यशस्वी अंमलबजावणी होईल, असे नाईक यांनी पुढे सांगितले.

एक राष्ट्र एक कर ही जीएसटीची संकल्पना आहे. जीएसटीमुळे देशाच्या विकासदरात एक ते दोन टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच जीएसटीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे प्रतिपादन जीएसटीचे आयुक्त के. अनपाझकन यांनी केले.

या माध्यम कार्यशाळेस सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्त गौरव जैन आणि हिमानी धमीजा यांनी जीएसटीवर माहीती दिली. तसेच पत्रकारांच्या सर्व समस्यांचे निवारण केले. यादरम्यान पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक डी. वी विनोदकुमार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. वार्तालाप या माध्यम कार्यशाळेची संकल्पना स्पष्ट केली. शहायक संचालक बालाजी प्रभूगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Related posts: