|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लोकप्रतिनिधींच्या राजकरणात अडकली स्मार्ट सिटी

लोकप्रतिनिधींच्या राजकरणात अडकली स्मार्ट सिटी 

सोलापुर/ श्रीकांत माळगे 

   सोलापूर महापालिकेवर सतांतर होऊन चार महिने होत आले. विद्यमान सत्ताधारी व पुर्वीचे विरोधक असणाऱया भाजपला सत्ता चालविणे जमत नसल्याच्या भावना येईपर्यंत पालिकेतील कारभार चालु आहे. अंदाजपत्रकाबरोबरच स्मार्ट सिटीच्या लोकार्पण समारंभालाही मुहुर्त मिळेना अशी परिस्थिती आहे. अंदाजपत्रकाचे घोडे गंगेत केंव्हा न्हाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  गेल्या तीन महिन्यापासुन प्रतिक्षेत असलेले सोलापुर महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा मुहुर्त ठरला होता. अंदाजपत्रकाच्या पुर्वसंध्येला चर्चा करण्यासाठी  बसलेल्या सत्ताधारी व विरोधकांनी आयुकतांच्या अनुपस्थितीमुळे 28 जुनची सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सभेसाठी जिल्हाधिकाऱयांना विचारणा केली असता आषाढी वारिमधे व्यस्त असलेले जिल्हाधिकारी त्यांच्या वेळेनुसार अंदाजपत्रकीय सभेचा मुहुर्त ठरविणार आहेत. 1 जुलै रोजी अंदाजपत्रकिय सभा होणार होते. पण  योग आलेला असतानाही हा योग टळला आहे.   

पालिकोतील अंदाजपत्रकाचा मुद्दा वरिष्ठ पातळीवर पोहोचला. गटबाजीतील राजकारणाने तु-तु मै-मै झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना अंदाजपत्रक दाखविले नसल्याने बापु गटाचा संताप वाढला होता. दरम्यान सहकारमंत्र्यांनी अंदाजपत्रकावर नजर फिरविलीच. तर पालकमंत्र्यांनी अखेरच्यावेळी उडी घेत विरोधकांचा विरोध आवळण्याचा प्रयत्न केला. अंदाजपत्रकास उशिर झाला असला तरी एकमताने मंजुरी मिळवु. याबाबत माझे सर्व पक्षाच्या नेत्यांशी बोलणे झाले आहे. मांडलेले अंदाजपत्रक सोलापुरकरांना पसंत पडेल अशा भावना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यकत केल्या होत्या. 

जुनच्या शेवटी अंदाजपत्रकीय मांडण्याची ग्वाही सत्ताधाऱयांनी दिली होती.  बऱयाच वादानंतर अंदाजपत्रकावर सत्ताधाऱयांसह विरोधकांनी बैठक घेत चर्चा केली. यामधे सत्ताधाऱयांनी 28 जुनला अंदाजपत्रक मांडु असे सांगितले. दरम्यान जुनच्या पहिल्या आठवडयापासुन अंदाजपत्रकीय सभेचा मुहुर्त ठरत नव्हता. दरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱयांना धारेवर धरत गांधीगिरी केली. 

                                                         

Related posts: