|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ात आता 41 ठिकाणी सीसीटीव्हीचा राहणार वॉच!

जिल्हय़ात आता 41 ठिकाणी सीसीटीव्हीचा राहणार वॉच! 

प्रतिनिधी / रत्नागिरी

गाडय़ा जोरात चालवताहेत, शहरात काही अनधिकृत घटना आणि काहीही अनुचित होत असेल तर या सगळय़ा गोष्टींना आता आळा बसणार आहे. कारण जिल्हय़ात 41 मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून 1 कोटी 30 लाख इतका खर्च करण्यात आला आहे. याचा शुभारंभ पुढच्या आठवडय़ात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली.

सीसीटीव्हीचे काम गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी जिल्हय़ात सुरू होते. आता राज्यातील अनेक शहरांमध्ये सीसीटीव्हींचा वॉच आहे. या सीसीटीव्हीमुळे जिल्हय़ातील अनुचित घटनांना आळा बसणार आहे. अनेक घटनांची या सीसीटीव्हीमुळे जिल्हा पोलिसांना माहिती होणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरही सीसीटीव्ही कार्यरत असल्याने धूमस्टाईलसह होणाऱया अपघातातील बारकावेदेखील कळणार आहेत. शहरातील काही मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्हीचा वॉच असणार असून यासाठी पेलिसांची नजर चुकवून पळणाऱयांना चांगला धडा मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सीसीटीव्हीचा शुभारंभ कधी होणार, असा प्रश्न होता. मात्र जिल्हा पोलीस दलाने हे काम पूर्ण करून घेतले असून रत्नागिरी शहरातच तब्बल 12 सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे. याचे नियंत्रण जिल्हा पोलीस दलाकडे असणार आहे. यासाठी स्वतंत्र देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली.

सीसीटीव्हीमुळे धूमस्टाईलला बसणार लगाम

वाहतूक पोलिसांना या सीसीटीव्हीची चांगली मदत होणार आहे. सीसीटीव्हीमुळे धूमस्टाईलला काही प्रमाणात लगाम बसणार आहे. त्यामुळे वारंवार कारवाई करण्याची वेळ येणार नाही. सध्या सीसीटीव्हीची धास्ती सर्वांनी घेतली असून वाहने वगैरे जपून चालवा अन्यथा थेट सीसीटीव्हीत दिसण्याची दखल घ्यावी लागणार आहे.

पोलिसांना सहकार्य करा!

सीसीटीव्हीचे काम वेळेत पूर्ण झाले असून यामुळे एक शिस्त निर्माण होईल. तसेच अनुचित घटनांना आळा बसेल. तरी नागरिकांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले असून पुढच्या आठवडय़ात स्वत: पालकमंत्री या उद्घाटन सोहळय़ाला उपस्थित राहणार आहेत