|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प

दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

महाबळेश्वर पासून नऊ किमी अंतरावर महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर चिखली रोड परिसरात रविवारी दुपारी दोन च्या सुमारास दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरडी कोसळण्याच्या घटना मागेदेखील घडल्या आहेत.जेसीबी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचायांनी दोन तासांच्या प्रयत्नाने वाहतुकीसाठी एकेरी मार्ग खुला करण्यात आला.

महाबळेश्वर व तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून येथून नऊ किमी अंतरावर महाबळेश्वर तापोळा या मुख्य रस्त्यावर चिखली रोड परिसरात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मुख्य रस्त्यावरच दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.दरड कोसळल्याची माहिती समजताच दरड हटविण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरुवात केली पावसाचा जोर अधिक असल्याने दरड हटविण्यास अडथळे येत होते जेसिबीच्या साहाय्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचायांनी दोन तासांच्या प्रयत्नाने दरड हटविल्यात आली व एक बाजू वाहतूकीसाठी खुली करण्यात आली,कोसळलेल्या दरडेमुळे गावांना जाण्याचा मार्गच बंद झाला होता म्हणून वाहतूक मांघर या मार्गावरून वळविण्यात आली.या परिसरात पावसाळ्यामध्ये नेहमीच दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात.दरड हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहा.अभियंता महेंद्र पाटील,डी एच पवार,एस डी भोसले,सुदेश जेधे आदी उपस्तिथ होते.

महाबळेश्वर व तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून आज अखेर अंदाजे 1385 मिमी(54.52 इंच) पावसाची नोंद झाली असून रविवारी सकाळी 8. 30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत 28.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Related posts: