|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » अमेरिकेकडून भारताला मिळणार 22 गार्डियन ड्रोन

अमेरिकेकडून भारताला मिळणार 22 गार्डियन ड्रोन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेकडून भारताला 22 प्रीडेटर गार्डियन ड्रोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेन सरकारच्या परराष्ट्र विभागाते ड्रोन निर्यात करण्यासाठी आवश्यक परवाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष्ग डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. मोदी – ट्रम्प यांच्या भेटीनंतर काही दिवसांमध्येच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताला ड्रोन निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने डीएसपी -5 गार्डियन निर्याच परवाने जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डीएसपी -5 श्रेणी परवाना सैन्य साहित्याच्या निर्यातीसाठी जारी करण्यात आला आहे. गार्डियन ड्रोनमध्ये हिंदी महासागरातील हालचाली टिपण्यास भारतीय सैन्यातील मदत होणार आहे. त्यामुळे हिंदी महासागरातील शत्रू सैन्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे भारताला शक्य होणार आहे.