|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » मी भारतात दहशतवादी हल्ले केले : सय्यद सलाहूद्दीन

मी भारतात दहशतवादी हल्ले केले : सय्यद सलाहूद्दीन 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहूद्दीनने एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना भारतात दहशतवादी हल्ले केल्याची कबुली दिली आहे. हिजबूलने आतापर्यंत काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे आपला हात असल्याची कबुली सलाहूद्दीने पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर दिली आहे.

मागच्या आठवडय़ात अमेरिकेने सय्यद सलाहूद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. जम्मू – काश्मीरला भारतापासून स्वतंत्र्य करण्यासाठी आपला सशत्त लढा यापुढेही सुरूच राहिल असे सलाहूद्दीनने शनिवारी सांगितले.