|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » न्यायाधीश कर्नान यांना झटका ; जामिन अर्जावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

न्यायाधीश कर्नान यांना झटका ; जामिन अर्जावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पश्चिम बंगाल सीआयडीकडून अटकेत असलेले कोलकाता न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. एस. कर्नान यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी तसेच त्यांच्या जामिन अर्जावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे कर्नान यांना एक मोठा धक्का समजला जात आहे.

कोलाकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कर्नान यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी. कर्नान हे कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे त्यांच्या जामिन अर्जावर त्वरीत सुनावणी घेण्याची आवश्यकता असल्याची याचिका कर्नान यांचे वकील मॅथ्यू जे. नेदुमपारा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने कर्नान यांच्या जामिन अर्जावर सुनावणीस नकार दिला.