|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » विविधा » आता विमानातही उभ्याने प्रवास  

आता विमानातही उभ्याने प्रवास   

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बस लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये तसेच खाजगी वाहनांमधून प्रवाशांनी उभ्याने प्रवास करणे नित्याचेच. पण आता विमानामधूनही प्रवासी उभे राहूक प्रवास करताना दिसण्याची शक्यता आहे.

कोलंबिया एअरलाईन्स नावाच्या विमान कंपनीने प्रवास करता यावा यासाठी या विमान कंपनीने आपल्या विमानामधून आसनव्यवस्था काढून टाकण्याचा विचार सुरू केला आहे. उभ्याने प्रवास केल्याने अधिक प्रवाशी विमानातून प्रवास करू शकतील आणि अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याने साहजिकपणे विमानाच्या तिकिटांचे दर कमी होतील, असा कंपनीचा कायास आहे. स्वस्तात विमान प्रवासाची सेवा देणारी व्हिवा कोलंबिया ही कंपनी आपल्या विमानातून पारंपारिक आसनव्यवस्था काढून टाकण्याच्या विचारात आहे.

याबाबत माहिती देताना व्हिवा कोलंबियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम शॉ म्हणाले, आमची विमान कंपनी विमानातून उभ्यानी प्रवास करता येण्याच्या पर्यायाचा अभ्यास करत आहे. आम्ही उभ्यांनी प्रवास करण्याविषयी लोकांना विचारले असता त्यांनी स्वस्तात प्रवास होण्यासाठी आपण काहीही करण्यात उत्सुक असल्याचे सांगितले.