|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Top News » छगन भुजबळ येणार तुरुंगाबाहेर ; राष्ट्रपती निवडणुकीत करणार मतदान

छगन भुजबळ येणार तुरुंगाबाहेर ; राष्ट्रपती निवडणुकीत करणार मतदान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मनी लाँड्रिंगप्रकरणी आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यास पीएमएलए न्यायालयाने परवानगी दिली आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया पदासाठी येत्या 17 जुलैला मतदान होणार आहे. आपण विधानसभेचे सदस्य असल्याने या राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, अशी मागणी भुजबळ यांनी पीएमएलए न्यायालयात केली. न्यायालयाने त्यावर सकारात्क विचार केला असून, भुजबळ यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी दिली आहे.

Related posts: