|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » उद्योग » जीएसटीचे भांडवली बाजाराकडून जोरदार स्वागत

जीएसटीचे भांडवली बाजाराकडून जोरदार स्वागत 

बीएसईचा सेन्सेक्स 300, एनएसईचा निफ्टी 94 अंशाने वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

सप्ताहाची सुरुवात बाजारात चांगली तेजी होत झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले. या तेजीमुळे निफ्टी 9600 च्या वर बंद झाला. सेन्सेक्स 300 अंशाने मजबूत झाला. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 9624 आणि सेन्सेक्स 31258 पर्यंत पोहोचण्यास यशस्वी झाला होता.

बीएसईचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 300 अंशाने वधारत 31,222 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 94 अंशाच्या तेजीने 9,615 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात खरेदी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांपेक्षा जास्त वाढत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत झाला.

सोमवारी भांडवली बाजारातील सर्व क्षेत्रांचे निर्देशांक वधारत बंद झाले. औषध आणि खासगी बँकांच्या समभागात काही प्रमाणात दबाव दिसून आला. बँक निफ्टी 0.25 टक्क्यांनी वधारत 23,272 वर बंद झाला. याव्यतिरिक्त एफएमसीजी, धातू, स्थावर मालमत्ता, वाहन, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल आणि वायू समभागात काही प्रमाणात खरेदी दिसून आली.

निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 4 टक्के, धातू निर्देशांक 1.8 टक्के आणि वाहन निर्देशांक 1.3 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला. बीएसईचा स्थावर मालमत्ता निर्देशांक 1.5 टक्के, भांडवली वस्तू निर्देशांक 0.5 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.6 टक्के, तेल आणि वायू निर्देशांकात 0.7 टक्क्यांनी मजबूती दिसून आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

भारती इन्फ्राटेल, आयटीसी, हिंडाल्को, आयशर मोटर्स, वेदान्ता, हीरो मोटो, कोल इंडिया, मारुती सुझुकी आणि अदानी पोर्ट्स 6.2-1.75 टक्क्यांनी वधारत बंद झाला. एचसीएल टेक, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, सिप्ला, सन फार्मा आणि ल्यूपिन 1.5-0.5 टक्क्यांनी घसरला.

मिडकॅप समभागात अशोक लेलँड, पेज इन्डस्ट्रीज, व्हिडिओकॉन, जिंदाल स्टील आणि एमआरएफ 6.8-3.7 टक्क्यांनी मजबूत झाला. स्मॉलकॅप समभागात ओमकार स्पेशियालिटी, टिनप्लेट, आरएस सॉफ्टवेअर, ग्रॅफाईट इंडिया आणि गणेश हाऊसिंग 20-12.2 टक्क्यांनी वधारले.

Related posts: