|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नारायण पै यांना ‘आतिथ्य रत्न पुरस्कार’

नारायण पै यांना ‘आतिथ्य रत्न पुरस्कार’ 

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील हॉटेल व्यावसायिक नारायण हरिश्चंद्र पै यांना ‘आतिथ्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले आहे. कर्नाटक प्रदेश हॉटेल आणि रेस्टॉरंट्स असोसिएशन यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. दि. 1 जुलै रोजी चित्रदुर्ग येथील श्रीराम कल्याण मंटप येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.

आपल्या व्यवसायात दिलेल्या योगदानाबद्दल तसेच अन्य क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेऊन आतिथ्य रत्न निवड समितीने नारायण पै यांची पुरस्कारासाठी निवड केली. चित्रदुर्ग येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळय़ास संघटनेचे अध्यक्ष एम. राजेंद्र, गौरव कार्यदर्शी मधुकर शेट्टी, निवड समितीचे अध्यक्ष एम. व्ही. राघवेंद्रराव यांच्यासह अन्य सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.