|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गोकुळतर्फे नंदवाळ दिंडीत दूध वाटप

गोकुळतर्फे नंदवाळ दिंडीत दूध वाटप 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

आषाढी एकादशी निमित्त प्रतीपंढरपूर असलेल्या नंदवाळ, ता.करवीर येथील आषाढी वारी दिवशी पुईखडी येथे आयोजीत रिंगण सोहळ्य़ावेळी गोकुळ तर्फे चेअरमन विश्वास पाटील, संचालक रामराजे कुपेकर यांच्या हस्ते सुगंधी दूध वाटप करण्यात आले. दिंडीतील जवळजवळ 25 हजार वारकऱयांनी याचा लाभ घेतला.

 यावेळी मार्केटिंग विभागाचे सहा.व्यवस्थापक हणमंत पाटील, जनसंपर्कअधिकारी मोहन यादव, याचबरोबर अधिकारी, कर्मचारी तसेच महिला बचत गटाकडील महिला उपस्थित होत्या.