|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूण कृती समितीने घेतली बांधकाम मंत्र्यांची भेट

चिपळूण कृती समितीने घेतली बांधकाम मंत्र्यांची भेट 

प्रतिनिधी/ चिपळूण

येथील कृती समितीने मंगळवारी मुंबई येथे जाऊन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन शहरातील बाधित जमीन मालकांना मिळणारा मोबदला कसा अल्प आहे हे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे त्यांनी येत्या आठ दिवसांत केंद्रीय दळणवळण, बंदर व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

  चौपदरीकरणात ग्रामीण भागाचा विचार करता शहरातील बाधितांना मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प आहे. त्यामुळे आमच्या भविष्याचा विचार करता आम्हाला प्रतिगुंठा 40 लाख रूपये भरपाई तसेच अन्य मागण्या असलेले निवेदन कृती समितीने नुकतेच गडकरी यांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर या समितीच्या प्रमुखांनी ही भेट घेतली.

  सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेत पाटील यांनी वरील आश्वासन दिले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष राजेश वाजे, राम रेडीज, नगरसेवक शशिकांत मोदी, राजू कानडे, मुश्ताक बेबल, संजीव नायर, गजानन पांचाळ, श्रीमती नेने आदी उपस्थित होते.