राजू शेट्टींच्या किसान मुक्ती यात्रेला आजपासून सुरूवात

ऑनलाईन टीम / मुंबई :
खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील शेतकर अंदोलनाला आजपासून मध्य प्रदेशातील मंदसौरपासून सुरूवात होत आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात्। राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून प्रवास करेल. ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवशेनाच्या सुरूवातीलाच दिल्लीत पोहचणार आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर 18 जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील एकत्र यावे असे अवाहन खासदार राजू शेट्टींनी केले आहे.
मध्य प्रदेशातील मंदासौरपासून किसान मुक्ती यात्रेची सुरूवात हाईल. या यात्रेत देशभरातील 130 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होतील. 18 जुलैला ही यात्रा दिल्लीत पोहचणार आहे. शेतकऱयांचा सताबारा कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशा मागण्या या यात्रेत असतील, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती.