|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सनातन संस्थेतर्फे येत्या 9 रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

सनातन संस्थेतर्फे येत्या 9 रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन 

प्रतिनिधी/ पणजी

गुरुपरंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने सनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने  9 जुलैला गोव्यात 5 ठिकाणी सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती व अन्य समविचारी संघटनांच्या सहकार्याने देशात 101 ठिकाणी हे गुरुपौणिमा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुपौर्णिमा महोत्सवाचे अयोजक तुळशिदास गांजेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेला सनातन संस्थेच्या संगीता नाईक व हिंदू जनजागृतीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी उपस्थित होते. या महोत्सवामध्ये श्री व्यासपूजन, गुरुपूजन, तसेच सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱया मान्यवरांचे विचार ‘शौर्यजागरणची आवश्यकता’ या विषयावरही मार्गदर्शन करण्यात येईल.

महोत्सव 9 रोजी पुढील 5 ठिकाणी आयोजित केला आहे. सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा येथे सायं. 4 वा., श्री महालक्ष्मी देवस्थान सभागृह, पणजी येथे सायं. 4.30 वा., श्री नारायण देवस्थान सभागृह काणकाबांध – म्हापसा येथे सायं. 4 वा., शिरोडकर सभागृह डिचोली येथे सायं 4 वा. आणि वेताळ पंचायतन देवस्थान सभागृह फातर्पा येथे सायं. 4 वा. अशा पाच ठिकाणी हा कार्यक्रम होईल.