OnePlus 5 वर Oxygen 4.5.5 अपडेट उपलब्ध

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने खास आपल्या ग्राहकांसाठी ऑक्सिजनॉस 4.5.3 चा अपडेट उपलब्ध केला आहे. या अपडेटचा लाभ वनप्लस 5 युजर्सनाच होणार आहे.
नेदरलँडमध्ये काही युजर्सकडून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे कंपनीने वनप्लस 5 मध्ये ऑक्सिजनॉस 4.5.4 अपडेट उपलब्ध केला होता. त्यानंतर आता कंपनीकडून आपल्या वनप्लस 5 युजर्ससाठी ऑक्सिजनोस 4.5.5 चा अपडेट जारी करण्यात आला आहे. या नव्या अपडेटनुसार वाय-फाय कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबीचा रॅम देण्यात आला असून, 64 जीबीचा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.
Related posts:
Posted in: माहिती / तंत्रज्ञान