|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कॅफेमराठी’ला गुगलचा पुरस्कार

कॅफेमराठी’ला गुगलचा पुरस्कार 

प्रतिनिधी, मुंबई

अलिकडेच गुगल इंडियाने भारतातील सर्वात लोकप्रिय, वेगाने पुढे येणाऱया आणि चाकोरीबाह्य विषय घेऊन वेब व्हिडीओ करणारे युटय़ूब चॅनल म्हणून ‘कॅफेमराठी’ला ‘युटय़ूब नेक्स्टअप इंडिया 2017’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ज्याची अधिकृत घोषणा गुगलने अलिकडेच त्यांच्या ब्लॉगवरून केली आहे. गुगलकडून असा बहुमान मिळणारे ‘कॅफेमराठी’ हे पहिले युटय़ूब चॅनल आहे.

काही महिन्यांपूर्वी पॅफेमराठीने ‘कॅफेमराठी बिंदास बोल’ ही व्हिडीओ सिरीज सुरू केली. ज्यात आजच्या तरुणाईला त्यांच्या विषयांवर बिंदास बोलण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता ‘कॅफेमराठी बिंदास बोल’ संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागला. आज ‘पॅफेमराठी बिंदास बोल’ पाहणाऱयांची संख्या 60 लाखांहून अधिक आहे तर 40 हजारांपेक्षा अधिक सक्रीय सदस्य आहेत. दर मंगळवारी दुपारी 3 वाजता ‘पॅफेमराठी बिंदास बोल’ व्हिडीओ प्रदर्शित होतो. ‘पॅफेमराठी’चे निर्माते निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन यांनी यावेळी सांगितले की, मराठी तरुणांना आपल्या गोष्टी न लाजता, न भिता बिंदास बोलता याव्या म्हणूनच ‘कॅफेमराठी बिंदास बोल’ची निर्मिती केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातले सर्व विषय हे तरुणांकडूनच सुचवले जातात. आता प्रत्येक मराठी तरुण आणि तरुणी कोणत्याही विषयावर बिंदास बोलत आहेत हे पाहून खूप आनंद वाटतो आहे. गुगलकडून असा बहुमान मिळाल्याने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. परंतु आता जबाबदारी अधिक वाढल्याने पुढे सातत्याने त्यात नवनवीन विषय करण्याचे आम्ही ठरवले आहे.

कॅफेमराठी बिंदास बोल’ महाराष्ट्र दौरा करणार

‘पॅफेमराठी बिंदास बोल’ची सर्वात जमेची बाजू म्हणजे, शो ची निवेदिका भक्ती पठारे. खाजगीमध्ये देखील जे विषय बोलायला मुलं-मुली लाजत होते, त्याच विषयांवर आता भक्ती त्यांना बिंदास बोलायला लावते; हीच या शो ची खरी गंमत आहे. यावेळी भक्ती म्हणाली की, आता ‘पॅफेमराठी बिंदास बोल’ मुंबई, पुणे इथेच न थांबता संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहे.