|Monday, June 17, 2019
You are here: Home » Automobiles » या कारवर मिळणार 10 हजारांपर्यंत सूट !

या कारवर मिळणार 10 हजारांपर्यंत सूट ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मारुती सुझुकी इंडियाने वॅगन आर आणि सेलेरियो यांसारख्या छोटय़ा आकाराच्या कारच्या किमतीत 10 हजारांपर्यंत कपात केली आहे. तसेच एर्टिगा डिझेलवर देण्यात आलेला डिस्काऊंट 15 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

कंपनीने एर्टिगाच्या डिझेल मॉडेल मॅक्सिमम रिटेल प्राइसवरील डिस्काऊंट वाढवून 20 हजार रुपये केला आहे. यापूर्वी कंपनीकडून 5 हजार रुपये डिस्काऊंट दिला जात होता. त्यामुळे सध्या युटिलिटी व्हेईकलची शोरुम किंमत 6 लाख 15 हजार 826 रुपये असणार आहे. कंपनीकडून छोटय़ा कारवर डिस्काऊंटवर बदल करण्यात आला. याचबरोबर 10 हजारपर्यंतचा भरघोस डिस्काऊंट दिला जाणार आहे.