|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉनकडून 1,680 कोटीची गुंतवणूक

ऍमेझॉनकडून 1,680 कोटीची गुंतवणूक 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

भारतातील ई व्यापार क्षेत्रातील आपले स्थान मजबूत करण्यासाठी ऍमेझॉनने देशात 1,680 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे. कंपनीने अगोदरच 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. फ्लिपकार्टकडून मिळणाऱया वाढत्या स्पर्धेला पाहता कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला. ऍमेझॉनने ही गुंतवणूक आपल्या ऍमेझॉन सेलर सर्व्हिसेस या उपकंपनीमध्ये गेल्या महिन्यात केली आहे.

भारतातील ई व्यापार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता गुंतवणूक करण्यासाठी कंपनी प्रतिबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा संपूर्ण इकोसिस्टमला देण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात आलेली आहे, असे ऍमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले. भारतीय बाजारात सेवा देण्यास प्रारंभ केल्यापासून कंपनीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांनी आपल्यासाठी भारतीय बाजारपेठ महत्त्वाची असल्याचे अगोदरच म्हटले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिकेच्या या कंपनीने भारतात अतिरिक्त 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. कंपनीने यापूर्वी 2 अब्ज डॉलर्सची भारतात गुंतवणूक केली होती.