|Monday, January 22, 2018
You are here: Home » उद्योग » पीएसयू बँक निर्देशांकात 2.5 टक्के वृद्धी

पीएसयू बँक निर्देशांकात 2.5 टक्के वृद्धी 

मुंबई / वृत्तसंस्था :

भांडवली बाजारात चांगली तेजी येत खरेदी झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 31,450 आणि निफ्टी 9,700 च्या वर पोहोचले होते. मात्र वरच्या पातळीवर नफेखोरी झाल्याने  उच्चांकावर जास्त वेळ निर्देशांक राहिले नाहीत. सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसअखेरीस 0.5 टक्यांनी वधारत बंद झाले.

बीएसईचा सेन्सेक्स 124 अंशाच्या तेजीने 31,369 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 37 अंशाच्या मजबूतीने 9,674 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही वरच्या पातळीवर नफेखोरी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारत 14,947 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी मजबूत होत 15,790 वर बंद झाला.

आयटी, मीडिया, औषध, खासगी बँक, तेल आणि वायू, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऊर्जा समभागात विक्रीने दबाव दिसून आला. निफ्टीचा आयटी आणि मीडिया निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घसरत बंद झाले. बीएसईचा तेल आणि वायू निर्देशांक 0.4 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.3 टक्के आणि ऊर्जा निर्देशांक 0.2 टक्क्यांनी कमजोर झाले.

पीएसयू बँक, वाहन, आर्थिक सेवा, एफएमसीजी, धातू आणि स्थावर मालमत्ता समभागात खरेदी झाल्याने बाजारात तेजी आली. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी वधारत 23,467 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 2.5 टक्क्यांनी मजबूत झाला. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.4 टक्के, अर्थसेवा निर्देशांक 0.6 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.9 टक्के आणि धातू निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वधारत बंद झाले.

दिग्गज समभागांची कामगिरी

भारती इन्फ्रा, एसबीआय, इंडियाबुल्स हाऊसिंग, आयटीसी, कोल इंडिया, भारती एअरटेल आणि भेल 2.9-1.3 टक्क्यांनी वधारले. बजाज ऑटो, आयशर मोटर्स, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, हिंडाल्को, आयओसी, सन फार्मा, ऍक्सिस बँक आणि ओएनजीसी 1.5-0.8 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात इंडियन बँक, व्हिडिओकॉन, पिरामल एन्टरप्रायजेस, आयडीबीआय बँक आणि अलाहाबाद बँक 8.1-3.25 टक्क्यांनी मजबूत झाले. जेएसडब्ल्यू एनर्जी, पेज इन्डस्ट्रीज, टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजीस, अदानी पॉवर आणि जीई टी ऍण्ड टी 4.6-1.5 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात हेस्टर बायो, जेबीएम ऑटो, ओरिएन्ट कार्बन, जेन टेक आणि गायत्री प्रोजेक्ट 20-11 टक्क्यांनी मजबूत झाले. इंडियाबुल्स व्हेन्चर्स, आर्कोटेक, ग्रॅफाईट इंडिया, आर्शिया आणि नेटवर्क 18 4.5-3.6 टक्क्यांनी कमजोर झाले.

 

 

Related posts: