|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कसबा सांगावच्या सरपंच सौ. माने यांच्याविरोधातील अविश्वास ठराव रद्द

कसबा सांगावच्या सरपंच सौ. माने यांच्याविरोधातील अविश्वास ठराव रद्द 

वार्ताहर /कसबा सांगाव :

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा सांगाव येथील मुश्रीफ गटाच्या सरपंच सौ. वंदना शिवाजीराव माने यांच्या विरोधात मंजूर केलेला अविश्वास ठराव रद्द करण्याचा निकाल जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होवून जिल्हाधिकाऱयांनी हा निकाल दिला. त्यामुळे सौ. वंदना माने यांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ग्रा. पं. सरपंच सौ. वंदना माने यांच्याविरोधात मुश्रीफ गटातीलच पाच सदस्य व महाआघाडीतील आठ सदस्यांनी एकत्र येवून कागलचे तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.  त्यानुसार तहसीलदारांनी 30 मे रोजी ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा बोलावून 13 विरुध्द 3 असा अविश्वास ठराव मंजूर केला होता.

दरम्यान, या अविश्वास ठरावाविरोधात सौ. माने यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे 5 जून रोजी तक्रार दाखल केली होती. त्या विरोधात सुनावणी होवून जिल्हाधिकारी यांनी वरील  निकाल दिला आहे. सरपंच यांनी यापूर्वी वार्षिक सभा व महिला सभा न घेतल्याच्या कारणावरुन त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सरपंच यांना धोरणात्मक निर्णयासाठी सहीचा निर्णय देण्यात आला. या याचिकेचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

सौ. माने यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात असे म्हटले आहे की, 30 मे रोजी तहसीलदारा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अविश्वास ठराव बैठकीत माझ्या विरोधात घाईगडबडीने ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. तसेच मुंबई उच्च न्यायालयात सरपंच अपात्रतेबाबत दावा प्रलंबित असताना दाखल केलेला अविश्वास ठराव बेकायदेशीर ठरतो व तहसीलदार कागल यांनी सरपंच यांच्या विरोधातील अविश्वास ठराव संबंधित नियमाचे पालन केले नसल्याच्या कारणावरुन  व अविश्वास ठरावाबाबतची नोटीस मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत विशेष सभा तहसीलदार यांनी बोलावणे गरजेचे होते. मात्र सदर सभा घेतली न गेल्याच्या कारणावरुन सरपंच यांच्याविरोधाच्या अविश्वास ठराव संबंधिचा नियम 1975 मधील नियम व तरतुदीचे उल्लंघन केल्याच्या मुद्यावरुन सरपंच यांच्यावरचा अविश्वास ठराव रद्द करत त्यांना दिलासा देण्याचा निकाल देण्यात आला आहे.

Related posts: