|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवशक्ती प्रतिष्ठानतफे गुणवंतांचा सत्कार

शिवशक्ती प्रतिष्ठानतफे गुणवंतांचा सत्कार 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

  येथील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने 10 वी मध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. गुणवंतांना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले. शिवाजी पेठ येथील सरनाईक कॉलनीमध्ये असणाऱया आदर्श प्रशालेमध्ये हा समारंभ संपन्न झाला.

 छत्रपती शिवरायांच्या मुर्तीचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या चरित्राविषयी व इतिहासाविषयी मार्गदर्शन केले. धनंजय नामजेशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानले. यावेळी विकास भोसले, नंदू कदम, माने सर, सुतार सर, देसाई सर, ऋषिकेश खरटमल यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.