|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बिल्वदल महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी शिल्पा साखळकर

बिल्वदल महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी शिल्पा साखळकर 

प्रतिनिधी /सांखळी :

सांखळी येथे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत बिल्वदल महिला सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संस्थेच्या अध्यक्षपदी कु. शिल्पा साखळकर यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी अनघा गुणाजी यांची निवड सर्वानुमते झाली आहे.

बिल्वदल-सांखळी या संस्थेच्या आमसभेत महिला विभागाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर लागलीच सांखळी पंचक्रोशीतील महिलांची बैठक वे. घन:श्यामशास्त्राr जावडेकर सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत महिलांना स्वबळावर उभे राहण्यासाठी सहकार तत्वावर विविध उपक्रम कसे राबविता येतील, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत म. कृ. पाटील, डॉ. राजेंद्र साखरदांडे, सागर जावडेकर, ऍड. करुणा बाक्रे, आनंद मयेकर इत्यादींनी मार्गदर्शन केले. ग्रामीण विकास यंत्रणा तसेच विविध सरकारी यंत्रणेमार्फत असलेल्या योजना महिला सहकारी संस्थेतर्फे राबविण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीत निवडण्यात आलेली समिती पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- शिल्पा साखळकर, उपाध्यक्ष- अपर्णा पिसुर्लेकर व सुहासिनी बाले, सचिव- अनघा गुणाजी, सहसचिव- रश्मी जोसलकर, खजिनदार- सरिता जोगळे, सहखजिनदार- ऍड. करुणा बाक्रे, सदस्य- प्रज्वलिता गाडगीळ, दिशा साळगावकर, वर्षा गावकर, रत्नप्रभा तारी, प्रणाली गावकर, प्रिया नार्वेकर, रश्मी गावस व मिताली साखळकर. या बैठकीला दिक्षीता च्यारी, आयुषी गावकर, वैशाली नाईक, तरुणा फळदेसाई, सुनंदा शिंदे, सिद्धी साळगावकर, सविता आमरे, रत्नप्रभा तारी, अमिता साळगावकर, वैशाली साखळकर, राजश्री साखरदांडे, आशा साखळकर, भाग्यश्री जावडेकर इत्यादी उपस्थित होत्या. महेश नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.

Related posts: