|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » युरोपियन युनियन चित्रपट महोत्सवाला मिळतोय देखणा प्रतिसाद

युरोपियन युनियन चित्रपट महोत्सवाला मिळतोय देखणा प्रतिसाद 

प्रतिनिधी /पणजी :

सध्या पणजीत सुरू असलेल्या युरोपियन युनियन चित्रपट महोत्सवाला प्रेक्षकांचा बऱयापैकी चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट पहाण्यासाठी येणाऱया प्रेक्षकांची संख्या वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटांची अभिरूची असलेल्या गोमंतकीय तसेच बिगरगोमंतकीय प्रेक्षकाबरोबरच गोवा मनोरंजन संस्थेच्या सिनेफाईल सदस्यांचाही समावेश झाल्यामुळे चित्रपट महोत्सवासाठी येणाऱया प्रेक्षकांच्या संख्येत प्रामुख्याने वाढ झाल्याचे गोवा मनोरंजन संस्थेच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे.  

युरोपियन चित्रपट महोत्सव गेल्या 3-4 वर्षांपासून होत असून आपण मनोरंजन संस्थेचा ताबा घेतल्यास हा पहिलाच महोत्सव असल्याचे गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दैनिक ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले. राज्याच्या विविध भागांमधून, अगदी मडगावसारख्या ठिकाणांहूनही चित्रपटांचे दर्दी चांगल्या दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी मुद्दामहून हजेरी लावत असल्याचे तालक यांनी सांगितले. या महोत्सवासाठी यंदा 3 हजार प्रेक्षकांनी आतापर्यंत हजेरी लावल्याचे तालक म्हणाले. महोत्सवादरम्यान प्रदर्शित होणारे रोजचे तीन चित्रपट पाहण्यासाठी दिवसाकाठी जवळपास 200 ते 300 प्रेक्षक उपस्थिती लावत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related posts: