|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतील काही भागात 24 तास पाणी बंद

मुंबईतील काही भागात 24 तास पाणी बंद 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील काही भागात आता पुढील 24 तास पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. महापालिकेकडून मरोळ- मरोशीपासून माहीम – रूपारेल ते रेसकोर्सपर्यंत जलबोगद्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

शुक्रवार 7 जुलै 2017 रोजी सकाळी दहापासून शनिवार 8 जुलै 2017 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा 24 तास बंद असेल.