|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » ऑनलाईन फसवणूक झाल्यास रक्कम मिळणार परत ; आरबीआयचा दिलासा

ऑनलाईन फसवणूक झाल्यास रक्कम मिळणार परत ; आरबीआयचा दिलासा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अनधिकृत इलेक्ट्रॉनिक्स बँक व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्यास संबंधित व्यक्तीला फसवणुकीतून गेलेली संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे. मात्र, याबाबतची माहिती तीन दिवसात बँकेला देणे गरजेचे असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले.

ऑनलाईन बँक व्यवहार करताना अनेकदा फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तीला रक्कम परत मिळत नसे. यावर आरबीआयनेही कडक पावले उचलत फसवणूक झालेल्या खातेदाराला संपूर्ण रक्कम परत देण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, संबंधित खातेदाराला तीन दिवसांमध्ये याबाबतची तक्रार देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित खातेदाराला 10 दिवसांमध्ये संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे.