|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » जीएसटी ; वस्तूंवर नव्या किमती न छापल्यास एक लाखाचा दंड

जीएसटी ; वस्तूंवर नव्या किमती न छापल्यास एक लाखाचा दंड 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या नव्या किमती छापणे बंधनकारक करण्यात आले असून, तसे न केल्यास संबंधित कंपनीला एक लाखापर्यंतचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय दंडासोबत कारावासाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते, असा इशारा केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी कंपन्यांना दिला.

जीएसटीनंतर उत्पादकांना न विकला गेलेला स्टॉक विकण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमतीत बरेचसे बदल झाले आहेत. त्यामुळे जीएसटीनंतर वस्तूंच्या नव्या किमती छापणे कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. जर कंपन्यांनी नव्या किमती वस्तूंवर छापल्या नाही तर संबंधित कंपन्यांना एक लाखापर्यंत दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. या दंडाच्या रकमेशिवाय कारावासाची शिक्षाही भोगावी लागणार असल्याचे पासवान यांनी सांगितले.