|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वृक्ष दिंडीतून सायगाव मधे जनजागृती

वृक्ष दिंडीतून सायगाव मधे जनजागृती 

वार्ताहर/ आनेवाडी

पर्यावरणाचा  बिघड़त असलेला समतोल यामुळे  पाउसाच्या प्रमाणात झालेली घट दुष्काळजन्य परिस्थिती यांच्यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करण्याचे आवाहन प्राचार्य एन.एस.जगताप यांनी केले

        लोहिया विद्यालय सायगाव मधील राष्ट्रीय हरित सेना यांच्यावतीने शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड अभियानात सहभागी होत गांवामधुन झाड़े लावा झाड़े जगवा,अश्या घोषणा देत पर्यावरण व वृक्ष संवर्धन जपण्यासाठी वृक्ष दिंडी चे आयोजन केले होते, यावेळी संपूर्ण गावातुन जनजागृती करीत विद्यार्थ्यानी फेरी काढली,तदन्तर विद्यालयाच्या प्रांगणात पर्यावरण पूरक वृक्षाची लागवड करीत वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला.

           या वृक्षदिंडी वेळी प्राचार्य एन एस जगताप,प्रा.एन एच शिंदे,राष्ट्रीय हरित सेना प्रमुख प्रा.आर एस मापारी,प्रा एस व्ही घाडगे,प्रा पठाण सर्, प्रा. खाड़े सर्, प्रा फरांदे सर्, प्रा मोरे सर् प्रा. कासुर्ड मॅडम यांच्या सह सर्व शिक्षक कर्मचारी दिंडी मधे सहभागी झाले होते

Related posts: