|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » शेतकऱयांच्या जमिनींना लाखाचे दर नको, त्यांची संमती घ्या : राजू शेट्टी

शेतकऱयांच्या जमिनींना लाखाचे दर नको, त्यांची संमती घ्या : राजू शेट्टी 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱयांच्या जमिनींना लाखाचे दर नव्हे तर त्यांची संमती घेतली जावी. शेतकऱयांच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनी घेऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला आहे. काल शुक्रवारी राजू शेट्टींचा किसान मुक्ती मोर्चा इंsदोरमध्ये पोहोचला, त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गासाठी जबरदस्तीने जमिनी हस्तांतरीत केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सरकारने दर जाहीर केले आहेत. जीरायती जमिनीला सरासरी हेक्टरी 50 लाख रूपये दर मिळणार आहे. किमान 40 लाख रूपये ते 85 लाख रूपये हेक्टरी भाव असेल, अशी माहिती जिह्याधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली आहे. हे दर एकरी असल्याचे अगोदर बोलले जात होते. मात्र एकरी नव्हे तर हेक्टरी म्हणजे अडीच एकरसाठी 50 लाख रूपये भाव देण्यात आला आहे.

 

Related posts: