|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शोभिवंत मत्स्यपालनातून शेतकऱयांना फायदा!

शोभिवंत मत्स्यपालनातून शेतकऱयांना फायदा! 

वालावल : वालावल येथे श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट (वालावल) व प्रगत सिंधुदुर्ग-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई होते.

मुळदे येथील मत्स्यवैज्ञानिक डॉ. नितीन सावंत यांनी शोभिवंत मत्स्यपालनातून शेतकऱयांना कसा आर्थिक फायदा होऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वालावल येथील लक्ष्मीनारायण तलाव मत्स्यसंवर्धनाकरिता मिळाल्यास जिल्हय़ातील एक मॉडेल म्हणून यावर काम करता येईल, असे सांगितले. डॉ. प्रफुल्ल माळी यांनी शेतीस जोडधंदा म्हणून फळबागांमध्ये कशाप्रकारे आंतरपिके घेऊन आर्थिक उत्पन्न वाढविता येईल, निळेली पशुपैदास केंद्राचे प्रमुख डॉ. कविटकर यांनी बंदिस्त शेळी-मेंढी प्रकल्प व जनावरांना होणारे रोग, तर डॉ. परेश पोटफोडे यांनी भातशेती व फळबागा यावर होणारे रोग व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. देसाई यांनी शेती व फळबागा, पशुसंवर्धन याबाबत जि. प.कडून करण्यात येत असलेली मदत व विविध योजना याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, तर सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले.