|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पालकांनी मुलांप्रमाणे मुलींनाही शैक्षणिक प्रोत्साहन द्यावे

पालकांनी मुलांप्रमाणे मुलींनाही शैक्षणिक प्रोत्साहन द्यावे 

वार्ताहर/ वाटेगाव

सर्वच क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने मुली यशस्वी होत आहेत. मुलगी सुध्दा कुटुंबाचे नाव मोठे करु शकते. तेव्हा पालकांनी मुलगा-मुलगी असा भेद भाव न करता मुलीनाही शैक्षणिक प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रविंद्र बर्डे यांनी केले.

वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे क्रांतिवीर बर्डे गरुजी संस्था समुहाच्या वतीने गुणवंत्त विद्यार्थीं, जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेले विद्यार्थीं, निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांचा व सैन्यात भरती झालेल्या जवानांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. दरम्यान  10 वी च्या परीक्षेत 90 ते 98 टक्के गुण मिळविलेल्या 21 विद्यार्थ्यांचा,  5 वी व  8 मधील शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थींना गौरविण्यात आले. तसेच सैन्यामध्ये भरती निवड झालेल्या पृथ्वीराज साठे, वाटेश्वर पाणी पुरवठा संस्थेचे कर्मचारी धोंडीराम बेंद्रे यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थी व सत्कारमुर्तींचा रविंद्र बर्डे, जेष्ठ समाज सेवक बाबासाहेब पाटील, शिक्षक नेते ग.चि.ठोंबरे, हरिचंद्र औताडे, तानाजी सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बर्डे गुरुजी सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ सचिन बर्डे, उपाध्यक्ष धनाजी ठोंबरे, संचालक शांताराम साळुंखे, नंदकुमार सुतार, निवृत्ती साठे, वसंतराव काळे, शामराव खोत, विकास शिंदे, ग्रा.पं.सदस्य हणमंत तिवले, तुकाराम नांगरे, शहाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप चव्हाण, अधिकराव पाटील, राजेंद्र पाटील, सुनिल ढेबे, जे.सी.ठोंबरे, संभाजी काळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. स्वागत वसंत शिंगारे यांनी केले. तानाजी खोत यांनी प्रास्ताविक केले. तर आभार जनार्दन साठे यांनी मानले.