|Saturday, October 20, 2018
You are here: Home » उद्योग » मुक्त व्यापारासाठी अनुदानकपात करा

मुक्त व्यापारासाठी अनुदानकपात करा 

हॅम्बर्ग

: सध्या जागतिक पातळीवर स्वतःची अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रत्येक देशाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. जी20 सदस्य असणाऱया देशांनी मुक्त बाजारपेठांसाठी सुधारणा करणे आणि अनुदानात कपात करणे आवश्यक आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिन लेगार्ड यांनी म्हटले आहे. भारत हा जी20 समुहाचा सदस्य आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्याने येणारे धोका ओळखण्याची गरज आहे. सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेची वाढ, समानता आणि मजबूत असणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेच्या युगात आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे गरजेचे आहे. सध्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असणारी वाढ ही संधी म्हणून पाहण्यात यावी. आर्थिक क्षेत्रातील हे भांडवलाचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी बँकांचा ताळेबंद आणि उद्योग क्षेत्रावर अधिक लक्ष द्यावे लागेल असे त्यांनी म्हटले.

पायाभूत क्षेत्रात उत्पादन वाढ, आर्थिक सेवा क्षेत्राचा विकास, महिलांना संधी, कामगार बाजारात सुधारणा या गोष्टींना प्राधान्य द्यावे असे त्यांनी म्हटले.

Related posts: