|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » उपराष्ट्रपती निवडणूक ; विरोधकांकडून गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी

उपराष्ट्रपती निवडणूक ; विरोधकांकडून गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

विरोधी पक्षांकडून पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. 17 विरोधी पक्षांनी गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू आहेत.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पदाचा कार्यकाळ पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया पदासाठी 5 ऑगस्टला मतदान होणार आहे. या पदासाठी 17 विरोधी पक्षांकडून गोपाळकृष्ण गांधी यांचे नाव निश्चित करण्यात आले. विरोधी पक्षांच्या या बैठकीला विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, संयुक्त जनता दलाचे शरद यादव, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन आणि माकपचे ज्येष्ठ नेते सिताराम येच्युरी यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.