|Monday, January 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

आषाढी अमावस्येला दिव्यांचे पूजन करा भाग्य उजळेल (पूर्वार्ध)

बुध. 12 ते 17 जुलै 2017

येत्या 23 जुलै रोजी आषाढी अमावस्या आहे. दिव्यांची अवस अथवा दिवसी अमावस्या म्हणून ती ओळखली जाते. या दिवशी दिव्यांचे पूजन करून त्याचा मंत्र म्हणून जे लक्ष्मी पूजन करतात त्यांच्या घरी लक्ष्मी कायम वास करते. दारिद्रय़ाचा लवलेशही राहत नाही. घरात समृद्धी येते, कोर्टप्रकरणे, खोटे आरोप, बदनामी, शत्रुत्व, हाती पैसा टिकत नसेल. आर्थिक घोटाळे झाले असतील, अपमानास्पद परिस्थिती, सतत आरोग्य बिघडणे, कुणाच्या मनात शत्रुबुद्धी निर्माण झालेली असेल. मुलाबाळांच्या भाग्योदयातील अडथळे, पती-पत्नीत संशयी वातावरण त्यामुळे घटस्फोटापर्यंत गेलेली प्रकरणे, स्वत:चे घरदार होत नसेल, डोळय़ांचे विकार असतील, खोटे  कागदपत्र, अथवा जबरदस्तीने सहय़ा घेवून कुणी मालमत्ता हडपली असेल, तुमच्या इस्टेट, वाहन, अथवा मुलेबाळे, पती पत्नी अथवा कुटुंबियांवर कुणा पापी लोकांची वाईट नजर असेल, सर्व काही सरळ चालले असताना अचानक काही तरी दुर्घटना घडून इस्टेट दुसऱयाच्या हाती गेलेली असेल. क्षुल्लक कारणावरून जिवावरचे प्रसंग, सरकारी अधिकाऱयांची खप्पामर्जी, नोकरी व्यवसायातील राजकारण, मागून टोमणे मारणाऱया हीन दर्जाच्या व्यक्ती, करणीबाधा करणाऱया मांत्रिकाकडून होणारी अघोरी कृत्ये, स्मशानबाधा घराण्यातील शापीत दोष, या सर्व अनिष्ट बाबीतून सुटका होण्यासाठी या अमावस्येला दिव्यांचे पूजन करतात. या दीप पूजनाचे महत्त्व वर्णन करायला कित्येक ग्रंथ लागतील. अर्धे आयुष्य खर्ची पडेल इतकी महत्त्वाची माहिती पूर्वीच्या काही ग्रंथात दिलेली आहे. जागेअभावी ती सर्व माहिती देता येणे शक्मय नाही. या अमावस्येला दीपावली लक्ष्मीपूजनाइतकेच महत्त्व आहे. म्हणून आंध्र, उत्तर प्रदेश, बिहार, पं. बंगाल, गुजराथ व राजस्थान तसेच कर्नाटकाच्या काही भागात दीपावलीप्रमाणेच रांगोळय़ा काढून दिव्यांची आरास करून मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी अभिषेकाच्यावेळी म्हणण्यात येणाऱया श्री सुक्ताची देवतापण अग्नि आहे. जेथे दिवा तेथे लक्ष्मीच वास हे समिकरण आहे. ज्यांना शक्मय आहे. त्यांनी या अमावस्येला दिव्यांची पूजा करून दिव्याचा कोणताही मंत्र म्हणावा. 108, 1008 किंवा त्याहून जास्त म्हटल्यास उत्तमच. स्वत:ला पूजन करता आल्यास चांगलेच. पण ते शक्मय नसेल तर तज्ञ भटजी, गुरुजी अथवा पुरोहितांकडून शास्त्राsक्त लक्ष्मीपूजन करून घ्या, अथवा आंबा किंवा उपलब्ध असणारी नारळ वगैरे फळांच्या रसाने अभिषेक करा. केवळ खजान्यात प्रसिद्ध झाले आहे म्हणून पूजा करू नका, आपले सर्वार्थाने भले व्हावे ही भावना ठेवून ती पूजा करा. दिव्याचे अनेक मंत्र आहेत. जो मंत्र माहीत आहे तो म्हणा. मुलांनाही म्हणण्यास सांगा. त्याचा निश्चित चांगला व रोकडा अनुभव येईल. ही अमावस्या सर्व बाबतीत कल्याण करणारी आहे, तिचे पावित्र्य भंग होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. या अमावस्येच्या दीप पूजन व लक्ष्मी पूजनाचे बरीच संकटे नाहीशी होतात पण हे सगळे जरी खरे असले तरी आपली बाजू सत्याची असेल तरच दैवी शक्तीचे सहाय्य मिळेल हे विसरु नये.

मेष

अति विचार व कामाचा अति ताण आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरेल. एखादी न सुटणारी समस्या सुटेल, आर्थिक व्यवहारात मोठे यश, घरादारासंदर्भातील कामे होऊ लागतील. नोकरी व्यवसायाच्या बाबतीत नव्या संधी. रवी, मंगळ, केतुचा षडाष्टक योग, दुर्घटना, आजार, अपघात, वाढते खर्च व गैरसमज या दृष्टीने त्रासदायक.


वृषभ

रवि, मंगळाचा शुभयोग काही बाबतीत अतिशय चांगली फळे देईल. काही अविस्मरणीय व भाग्यवर्धक अनुभव येवू शकतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. मोठमोठे समारंभ, मेळावे, प्रवास वगैरे ठिकाणी किमती वस्तू हरवण्याची शक्मयता. सर्व दृष्टीने जपावे लागेल. धनलाभ व महत्त्वाच्या व्यवहाराने सप्तहाची सुरुवात होईल.


मिथुन

अचानक पाहुणे मंडळी येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता. खर्च वाढतील नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी स्वीकारून काही जणांना खूष ठेवावे लागेल. त्यामुळे मनस्वास्थ्य ठीक राहणार नाही. सामाजिक प्रति÷ा व आरोग्याची काळजी घ्यावी. ऐनवेळी झालेल्या घोटाळय़ामुळे सरकारी कामे खोळंबतील.


कर्क

कामाच्या घाईगडबडीत कोणतेही महत्त्वाचे काम करू नका.  प्रवासात धोका अथवा वाहन बिघडणे असे अनुभव येतील. मुलाबाळांच्या बाबतीत काही इच्छा पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. गुप्तशत्रुंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेदाला गंभीर वळण लागेल. सर्व तऱहेने सांभाळावे. प्रेमप्रकरणे व मोबाईलवरील संदेशापासून जपा.


सिंह

सरकारी कामे होऊ लागतील. राशिस्वामी रवि, मंगळाच्या सान्निध्यात आहे न होणारी कामेसुद्धा होतील. काही क्यक्तींच्याकडून वास्तुसंदर्भात फसवणूक, त्यामुळे आर्थिक नुकसान, नको त्या व्यक्तीमुळे मनस्ताप, संततीविषयक बाबींसाठी वेळ काढावा लागेल. इतरांची जबाबदारी स्वीकारल्याने कामात विलंबाने यश. भागीदारी व्यवसायात निर्णायक प्रसंग.


कन्या

ऐनवेळी येणाऱया पाहुणे अथवा पत्रामुळे महत्त्वाच्या कामासाठी स्वत:च धावपळ करावी लागेल. रहाते घर अथवा वास्तुसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्याल. आर्थिक व्यवहारात चांगले यश. आरोग्याच्या तक्रारी तसेच शत्रुपीडा यापासून जपावे. वैवाहिक जीवनात अपेक्षित शुभ घटना. खर्चाच्याबाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.


तूळ

आर्थिक व्यवहारात चांगले योग. नवे वाहन अथवा कोणतेही नवीन काम सुरू करण्यास हरकत नाही. पण मध्यस्थीच्या दृष्टीने त्रासदायक बुध, राहू युती आर्थिक बाबतीत यश देईल. गुंतवणुकीच्या व्यवहारात सावधानता बाळगल्यास मोठे यश. कोर्टकचेरीच्या संदर्भातील कामांना गती मिळेल. नोकरी व्यवसायात काही अनुकूल फेरबदल.


वृश्चिक

जागेसंदर्भात चालू असलेल्या कटकटींना पूर्ण विराम मिळेल. वैवाहिक जीवनात शुभ घटनांचे नवे पर्व सुरू होईल. भाडेकरू व घरमालक यांच्यातील मतभेद संपतील पण कर्जाचा तगादा लावणारी पत्रे फोन व संदेश यापासून जरा जपावे लागेल. प्रवास, धनलाभ व महत्त्वाच्या क्यवहारात यश मिळेल.


धनु

इतरांच्यावर अवलंबून राहिल्याने आर्थिक कामे खोळंबतील. मनस्वास्थ्य ठीक राहणार नाही. सांसारिक जीवनात काळजी घ्यावी. एखादे वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. विवाह झालेला असेल तर पूर्वीच्या आठवणींना उजाळा देवू नका. नको त्या व्यक्तीमुळे गैरसमज. कामात विलंबाने यश, वाढत्या खर्चामुळे देणी रेंगाळतील.


मकर

नोकरी व्यवसाय क्षेत्रात आमुलाग्र फेरबदल होतील. देण्या घेण्याच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना. कर्जप्राप्तीसाठी प्रयत्न केला असाल तर काम होईल. पोटाच्या विकारांमुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शत्रुंच्या कारवायावर लक्ष ठेवावे. नोकरी व्यवसायात चांगल्या महत्त्वाच्या घटना घडतील. पण मतभेद टाळावेत.


कुंभ

काही गरजवंतांच्या अडचणी तुम्हाला फायदेशीर ठरतील. वास्तुसंदर्भात महत्त्वाच्या घटना. नोकराचाकरांचे अति लाड अथवा सलगी या आठवडय़ात महागात पडतील. मोबाईल व तत्सम  वस्तु इतरांना देताना काळजी घ्या. इतरांच्या कौटुंबिक प्रश्नात हस्तक्षेप केल्याने त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. काही कामात विलंबाने यश, बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करा.


मीन

स्वत: जे कराल ते काम हमखास यशस्वी होईल. कुणावर विसंबून राहू नका. मुलाबाळांच्या वागण्यामुळे कौटुंबिक सुख समाधान राहणार नाही. त्यांच्या बाबतीत जरा कठोर व्हावे लागेल. पूर्वजांचा व्यवसाय पुढे चालू ठेवल्यास चांगले यश, राजकीय व सामाजिक क्षेत्रात असाल तर जरा जपून रहा. क्षुल्लकशी चूकदेखील  अडचणीत आणू शकेल.

 

Related posts: