|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » काश्मीरमधील कुपवाडय़ात पुन्हा दहशतवादी हल्ला ; 2 जवान शहीद

काश्मीरमधील कुपवाडय़ात पुन्हा दहशतवादी हल्ला ; 2 जवान शहीद 

ऑनलाईन टीम / जम्मू-काश्मीर :

काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील सीमाभागात आज पुन्हा दहशतवादी हल्ला झाला. केरन सेक्टरमध्ये अचानक झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले.

दोनच दिवसांपूर्वीच जम्मूतील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरुंच्या एका बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यात 7 यात्रेकरुंचा मृत्यू झाला. त्यानंतर काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर या भागात भारतीय लष्कराने शोध मोहिम राबवली आहे. दरम्यान, आज काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील सीमाभागातील केरेन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत.