|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आसाममधील पूरबळींची संख्या पोहोचली 45 वर

आसाममधील पूरबळींची संख्या पोहोचली 45 वर 

गुवाहाटी

 आसाममध्ये आलेल्या पूरामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या वाढत आहे. बुधवारी 5 जण बुडाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या 45 वर पोहोचली आहे. राज्यातील पूरस्थिती कायम राहिल्याने बुधवारी एका महिला, 2 मुलांसमवेत 5 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. ब्रह्मपुत्रा आणि सुबनसिरी नदीच्या संगमावर वसविण्यात आलेले सर्वात मोठे बेट पुराच्या पाण्याने वेढले गेल्याने 33 हजारपेक्षा अधिक जण प्रभावित झालेत. हे बेट आसामच्या वैष्णव संस्कृतीचे केंद्र मानले जाते. काझीरंगा नॅशनल पार्कमधील स्थितीचा देखील मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. 430 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या या उद्यानात अनेक फूट पाणी भरले आहे. येथे आलेल्या पुरामुळे 2 गेंडय़ांना जीव गमवावा लागला. पूरामुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडल्याचेही वृत्त आहे.